
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी अदाणी कंपनीला ट्रान्समिशन लाइन टाकायची असून या प्रकल्पामुळे २०९ कांदळवनांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या परवानगीसाठी उच्च न्यायालयात अदाणी समूहाकडून याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकारसह इतर प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.