खासगी रुग्णालयात लसीकरणास सुरुवात, तरीही सरकारी रुग्णालयांवर पडतोय भार

खासगी रुग्णालयात लसीकरणास सुरुवात, तरीही सरकारी रुग्णालयांवर पडतोय भार

मुंबई: लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांचा समावेश जरी केला असला तरी मुख्य भार हा सरकारी रुग्णालयांवरच आहे. मात्र, मुंबईतील ज्या खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी जास्तीत जास्त क्षमता असेल तिथे दिवसाला किमान 7 ते 8 हजार अधिक लोकांना लस दिली जाऊ शकते. त्यामुळे, सरकारी रुग्णालयांवर जास्तीचा भार असणार आहे. 

गुरुवारी 13 खासगी रुग्णालयांनी लसीकरणात सहभाग घेतला. आतापर्यंत 29 पैकी 13 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांत ही संख्या 35 वर जाईल. दरम्यान, मुंबईतील दररोजच्या लसीकरणाची संख्या वाढण्याची गरज असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
मुंबई शहरात दिवसाला 11 ते 12000 तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण केले जात आहे. सोमवारपासून ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असणाऱ्या लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे. तेव्हापासून बुधवारी 18 हजार 566 आणि गुरुवारी 22 हजार 975 एवढी ही संख्या गेली आहे. 

गुरुवारी 13 खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त सहा केंद्रीय आरोग्य विमा असणाऱ्या रुग्णालयांनी लसीकरणात सहभाग घेतला. त्यामुळे, एकूण 19 रुग्णालयांनी 4000 च्या वर आणि पालिका रुग्णालयांनी 18, हजारच्या वर लसीकरण केले आहे. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून दररोज 50 हजारांपर्यंत लसीकरण करण्याचा विचार आहे. बरीचशा लोकसंख्येचे अजून लसीकरण व्हायचे आहे. आणि आम्हाला ते लवकर करायचे आहे. दवाखाने आणि स्थानिक केंद्रांचा यात समावेश केला जाऊ शकतो. 

पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. आम्हीही तपासणी करुन आणि वेगाने परवानग्या देत आहोत. लसीकरणाच्या मोहिमेने वेग धरणे गरजेचे आहे. 

 गुरुवारी बऱ्याचशा खासगी रुग्णालयांना 100 जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. ते त्यांनी पूर्ण केले.  त्यापैकी काही रुग्णालयांनी ही संख्या लवकरच दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूजा रुग्णालयाचे सीओओ जॉय चक्रबोर्थी यांनी सांगितले की, खासगी रुग्णालये लसीकरणाचा वेग वाढवतील. जवळपास दररोज किमान 300 लोकांचे लसीकरण करता येऊ शकते. तर, प्रमुख आणि चांगल्या सुविधा असणारे खासगी रुग्णालये 7 ते 8000 लोकांना लस देऊ शकतील.
 
शिवाय, काही रुग्णालयांमध्ये जागेच्या अभावामुळे 300 चे लक्ष्य गाठता येणार नाही असे त्यांना वाटते. कारण, वेगळा प्रवेश गेट, बाहेर जाण्याचा मार्ग, प्रतिक्षालय आणि सोशल डिस्टस्टिंग पाळण्यासाठी पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता काही रुग्णालयांना हे लक्ष्य गाठण्यासाठी योग्य सोय करावी लागेल, असे ही डॉ. चक्रबोर्थी यांनी सांगितले.  आजपासून ब्रीच कँडी, एचएन. रिलायन्स आणि मसीना रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. 

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Additional burden government hospitals after Vaccination started private hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com