esakal | मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईकरांसाठी हा आठवडा महत्वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईकरांसाठी हा आठवडा महत्वाचा 

महापालिका पुढील आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करणारेय. शाळा आणि महाविद्यालयांबाबतही आठवडाभराने निर्णय होऊ शकतो.

मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईकरांसाठी हा आठवडा महत्वाचा 

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता सर्वसामान्यांच्या लोकल सेवेवरही गडांतर होण्याची शक्यता आहे. महानगर पालिका पुढील आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांबाबतही आठवडाभराने निर्णय होऊ शकतो.

सर्वसामन्यांना पूर्वी प्रमाणे लोकल सेवा सुरु करण्यासाठी 15 दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे. हा कालावधी 21-22 फेब्रुवारीला संपेल. त्या दरम्यान रुग्णसंख्येचा आढावा घेऊन सर्वसामान्य प्रवाशांबाबत निर्णय घेण्यात येईल.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्यासाठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काकाणी यांनी सांगितलं की, रूग्णांच्या संख्येत 10 ते 20 टक्के वाढ होत राहिल. मात्र, 22 फेब्रुवारीला होणाऱ्या आढावा बैठकीत रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निरीक्षणात आल्यास लोकलसाठी वेगळा निर्णय घेण्यात येईल. 

मुंबई महानगर पालिका आणि आजूबाजूच्या महानगर पालिकांमधील परिस्थिती विचारत घ्यावी लागेल. नंतर त्या संदर्भातील शिफारस, मुद्दे राज्यशासनाला उपलब्ध करून देऊ, त्यानंतर निर्णय घेता येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. महाविद्यालय आणि शाळा सुरु करण्याबाबतही तेव्हाच निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- नवी मुंबईच्या झुंजारे कुटुंबियांवर काळाचा घाला, ११ वर्षांच्या अर्णवनं गमावले आई-वडील

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Additional Municipal Commissioner Suresh Kakani on local train corona virus

loading image
go to top