esakal | झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...
sakal

बोलून बातमी शोधा

झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या नौदलाच्या मुंबईतील तळातही कोरोना व्हायरसने घुसखोरी केली

झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या नौदलाच्या मुंबईतील तळातही कोरोना व्हायरसने घुसखोरी केली. आयएनएस आंग्रे या नौदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या पश्चिम विभागीय तळामधील 21 नौदल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली असून, हा तळच लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. यातून सर्वांत महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे, या तळावर हा व्हायरस कोठून आला? 

मोठी बातमी - जरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय ?

त्याची चौकशी केली असता समजले, की नौदलाच्याच एका साह्य संस्थेतील कर्मचा-याकडून ही बाधा झाली आहे. गेल्या सात एप्रिलला तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्याच्यामुळे आयएनएस आंग्रेमधील 21 कर्मचारी कोरोनाबाधीत झाले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले, की आता या कर्मचाऱ्यांना नौदलाच्या आयएनएस अश्विनी या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर आंग्रे तळाचा परिसरही लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना झालेले हे कर्मचारी एकाच निवासी इमारतीत राहत होते, तर एकविसावा कर्मचारी हा आंग्रे शेजारील नौदलाला सहाय्य करणाऱ्या संस्थेतील होता. यासंदर्भात कोरोना विषयक आरोग्य निकषानुसार योग्य ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी ; २० एप्रिल नंतर महाराष्ट्रात 'या' गोष्टी होणार सुरु...

काळजी नको! नौदलाच्या पाणबुड्या सुरक्षित
मुंबईतील आयएनएस आंग्रे या नौदलाच्या तळामध्ये 21 नौदल कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. त्यामुळे हा संपूर्ण तळ लॉकडाऊन करण्याची वेळ आली. या घटनेमुळे नौदलाच्या युद्धनौका किंवा पाणबुड्यांचे काय असा सवाल निर्माण झाला होता. परंतु नौदलाच्या प्रवक्त्याने याबाबतची एक दिलासादायक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, की आयएनएस आंग्रे येथे नौदलाच्या बराकी आहेत. येथून मुंबई नौदल गोदीला तसेच युद्धनौकांना सोयीसुविधा पुरविल्या जातात. मात्र सुदैवाची गोष्ट अशी की नौदलाच्या युद्धनौका किंवा पाणबुड्यांवरील कोणाही खलाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नाही.

how corona virus entered Indian navy thruth reveled read full story

loading image