मध्य रेल्वे मार्गावर अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालविणार

प्रशांत कांबळे
Wednesday, 18 November 2020

सणांच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी  करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयनगर, रक्सौल दरम्यान आणखी सहा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई:  सणांच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी  करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयनगर, रक्सौल दरम्यान आणखी सहा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

या ट्रेन पूर्णतः आरक्षित असून 05548 आणि 05268 या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग विशेष शुल्कासह 20 नोव्हेंबर पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. दरम्यान केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची  परवानगी देण्यात येईल. त्यासोबतच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

अधिक वाचा- मुंबईत तीन लज्जास्पद घटना, लहान मुलींवर लैंगिक अत्याचार

लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर साप्ताहिक उत्सव विशेष  गाड्या (चार फेऱ्या)

05547 विशेष सुपरफास्ट  जयनगर येथून 23, 30 नोव्हेंबर रोजी सुटेल (दोन फे-या) आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. 
05548 विशेष उत्सव  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 26 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबर रोजी सुटेल (दोन फेऱ्या) आणि दुसर्‍या दिवशी जयनगरला पोहोचेल. 

थांबे आणि वेळ- नियमित ट्रेन क्र. 15547/15548 एक्सप्रेस प्रमाणे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या (दोन फे-या)
05267 विशेष उत्सव ट्रेन रक्सौल येथून 28 नोव्हेंबर रोजी सुटेल आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे  पोहोचेल.

अधिक वाचा- मुंबईत दिवाळीमध्ये फटाके फोडले, नियमभंगाच्या 40 प्रकरणांची नोंद

05268 विशेष उत्सव ट्रेन  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 डिसेंबर रोजी सुटेल आणि तिसर्‍या दिवशी रक्सौल येथे पोहोचेल.

थांबे आणि वेळ- नियमित गाडी 15267/15268 एक्सप्रेस प्रमाणे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Additional trains will run special trains on the Central Railway line


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional trains will run special trains on the Central Railway line