esakal | कोरोना चाचणीची सक्ती नाही : अदिती तटकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोरोना चाचणीची सक्ती नाही : अदिती तटकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : गणेशोत्सवासाठी रायगड (Raigad) जिल्ह्यात येणाऱ्या नोकरदारांसाठी कोरोना (Corona) चाचणी सक्तीची नाही; परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून चाचणी करून घेतल्यास कुटुंबाचे (Family) आरोग्य (Health) अबाधित राहणार आहे. याशिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) मुकाबला अधिक प्रभावीरीत्या करता येईल, असे असे पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.

नियोजन भवन बैठक सभागृहात गणेशोत्सव २०२१ पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख आदी बैठकीस उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड, रस्ते वाहतूक अशा विविध विभागांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतींच्या थकीत देयकांबाबत तात्काळ आढावा घेऊन त्यांना सुधारीत देयके देण्याचे तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बंद पडलेल्या बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे त्यांनी या वेळी सूचित केले.

हेही वाचा: गणेश मंडळांना हवी स्थिर ढोल वादन करण्याची परवानगी

एक खिडकी योजना कागदावरच

भाईंदर : गणेश मंडळांना घ्याव्या लागत असलेल्या विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी मिरा भाईंदर पालिकेने घोषित केलेली एक खिडकी योजना अद्याप अनेक ठिकाणी सुरू झालेली नाहीत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेची परवानगी, अग्निशमन विभाग तसेच पोलीस विभाग यांचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. या परवानग्या घेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कार्यालयाच्या फेन्या माराव्या लागू नयेत यासाठी एक खिडकी योजना जाहीर केली. मंडळांनी अर्ज केल्यानंतर सर्व परवनग्या एकाच ठिकाणी मिळणार आहेत. परंतु अद्याप ही योजना सुरू झालेली नाही.

loading image
go to top