निवडणूक लढणाऱ्या पहिल्याच ठाकरेंसाठी वरळीत कौतुक सोहळा

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

वरळी येथे कार्यकर्ता मेळाव्यात आदित्यच्या उमेदवारीची घोषणा होईल. या समारंभाला आदित्य यांनी स्वत: आग्रहपूर्वक आई रश्मी यांनी जातीने हजर रहावे असे विनवले आहे. छोटा भाऊ तेजस यासाठी खास लंडनहून आला आहे.

मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या पहिल्याच ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरेंना आज (सोमवार) किमान पाच हजार शिवसैनिक मानाची सलामी देणार आहेत.

वरळी येथे कार्यकर्ता मेळाव्यात आदित्यच्या उमेदवारीची घोषणा होईल. या समारंभाला आदित्य यांनी स्वत: आग्रहपूर्वक आई रश्मी यांनी जातीने हजर रहावे असे विनवले आहे. छोटा भाऊ तेजस यासाठी खास लंडनहून आला आहे. जागावाटप चर्चेत या वेळी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांच्या बरोबरीने आदित्य सहभागी झाले.

खांद्याला खांदा लावून चिरंजिव काम करत असल्याने वडिल खूष असणे सहाजिक आहे. सेनेच्या सर्व प्रमुख  नेत्यांसह युवा सेनेचे पदाधिकारी वरूण सरनाईक, सूरज चव्हाण या आयोजनाकडे लक्ष ठेवून आहेत. आधुनिक विचारांचा उच्चशिक्षित ठाकरे मैदानात उतरत असल्याचा आनंद सर्वत्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray contest Vidhan Sabha election in Worli