Aditya Thackeray : भाजपने गद्दारांना त्यांची लायकी दाखवली; आदित्य ठाकरेंची टीका

मिंधे गटाला गुजरात मधून आदेश आला नसून, भाजप गद्दारांना उमेदवारी देईल याबाबत देखील साशंकता आहे.
aditya thackeray criticize shiv sena eknath shinde group bjp political alliance
aditya thackeray criticize shiv sena eknath shinde group bjp political allianceSakal

Thane News : मिंधे गटाला गुजरात मधून आदेश आला नसून, भाजप गद्दारांना उमेदवारी देईल याबाबत देखील साशंकता आहे. त्यामुळे गद्दार सेनेचे हाल काय झाले हे आपण बघत आहोत, त्यामुळे त्यांची लायकी दाखवून दिली असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

ते ठाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवार २९ एप्रिल रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने आनंद दिघे समाधी स्थळाचे दर्शन घेवून मिरवणुक काढीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या मिरवणुकीत आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टिका केली. मिंधे गँगला अजून गुजरातमधून आदेश आलेला नाही की तिकीट कोणाला द्यायचे.

त्यांना तिकीट मिळेल की नाही हि शंका आहे, अशी टिका देखील ठाकरे यांनी केली. तसेच आमच्याकडची गर्दी प्रेमाची आहे आणि प्रेमाच्या नात्याची माणसे आमच्याकडे आहेत. भाजप महाराष्ट्र आणि देश संपवायला निघाली आहे. परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत.

तसेच दिल्ली पुढे आम्ही झुकणार नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आणि इंडीया आघाडी देशभरात अग्रेसर असून आम्ही सर्वजण संविधानासाठी एकत्र आलो आहोत. ज्या लोकांनी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला.

आता हेच सगळे लोक महाराष्ट्र तोडू पाहत आहेत आणि हेच बाहेरचे लोक आम्हाला शिकवत आहे की शिवसेना काय आहे. पण, जनता त्यांना दाखवेल शिवसेना काय आहे. ४ जूनला ठाण्यात विजयाची मिरवणुक निघेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील, आजचा हा जमलेला जनसमुदाय बघता हि विजयाची रॅली वाटत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. नरेंद्र मोदी हे भाषणात महत्वाचे मुद्दे बोलत नाही. १० वर्ष फक्त फसवणूक केली, त्यांना जनता मुख्य असल्याचे वाटत असल्याचे देखील आव्हाड यांनी सांगितले.

विकासाचे विषय बाजूला ठेवले. एम.के. मढवी प्रकरणी त्यांनी पोलिसांना जाहीर आवाहन देखील त्यांनी केले. सहा महिन्यात महीन्यात सरकार बदलणार आहे. जास्त करू नका मर्यादेच्या बाहेर जावून वागाल तर, आम्ही देखील लक्षात ठेवू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे. राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. राजन विचारे यंदा हॅट्रिक करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरता हजारोच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com