
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा उड्डाणपुलाचे उदघाटन सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी केले. मात्र दोनच दिवसांत त्या पुलावर खड्डे पडल्याने हा पूल चांगलाच चर्चेत आला. शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडी उत्सवासाठी डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड असलेला पलावा पूल पहायचा राहिला. मात्र तो पाहण्यासाठी लवकरच येईल असे म्हणत शिंदे गटाला टोला लगावला आहे.