esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

मुंबईतून नेतृत्व मिळण्याची ठाकरेंना खात्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पर्यावरणातील बदलांविरोधातील (Environmental changes) लढ्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी (women's participation) राज्य सरकारने (mva government) स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने विशेष कार्यक्रम आखला आहे. याद्वारे या जागतिक लढ्यासाठी मुंबईतून नेतृत्व मिळेल, अशी खात्री पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा: शाळेत असलेल्या कैद्यांमुळे विद्यार्थी माघारी; विलगीकरण कक्ष सुरूच

पर्यावरण जपणुकीच्या लढ्यातील अग्रणी जागतिक संघटना सी-४० सिटीज नेटवर्कतर्फे ‘मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लान’ हा विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. स्वच्छ पर्यावरणासाठीची चळवळ कोण महिला पुढे नेऊ शकतील, हे शोधून त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देणे, हादेखील याचा एक हेतू आहे.

ही संघटना यासंदर्भातील आपला जगभराचा अनुभव, माहिती या लढ्यातील कार्यकर्त्या महिलांना देईल, तसेच यासाठी त्यांना प्रशिक्षण व सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जातील. एका विशेष कार्यक्रमाद्वारे या महिला शोधून त्यांना सर्व ते साह्य दिले जाईल. त्यासाठी दर महिन्याला वेबिनार आयोजित केले जातील, त्यात सर्व महिलांना आपले अनुभव एकमेकांना सांगून त्याद्वारे शिकता येईल असा हेतू आहे.

"महिलांचे पर्यावरणविषयक ज्ञान तसेच नेतृत्वगुण अद्ययावत करण्यासाठीही साह्य केले जाईल. या १० महिन्यांच्या कार्यक्रमासाठी मुंबईकर महिलांनी पुढे यावे."
- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री.

loading image
go to top