esakal | आदित्य ठाकरेंचा हिरव्या बॅनरवरचा फोटो व्हायरल , नेमकं काय आहे सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरेंचा हिरव्या बॅनरवरचा व्हायरल फोटो, नेमकं काय आहे सत्य

आदित्य ठाकरेंचा हिरव्या बॅनरवरचा व्हायरल फोटो, नेमकं काय आहे सत्य

sakal_logo
By
सुमित सावंत

मुंबई: मराठी माणसाच्या (Marathi manoos) हक्कासाठी उभी राहिलेली शिवसेना (shivsena) कायम हिंदुत्वासाठी (Hindutva) पुढाकार घेत असलेली सगळ्या जगाने पाहिलीय. पण हीच शिवसेना गेल्या काही काळापासून सर्वसमावेशक होऊ पाहतेय का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्याला कारणं अनेक आहेत पण सध्या या संदर्भातील चर्चा अधिक रंगू लागली त्याचं मुख्य कारण आहे, सोशल मीडियावर (social media) व्हायरल होणारा आदित्य ठाकरेंचा एक फोटो.

वरळीमध्ये एका मोठ्या हिरव्या रंगाच्या कटआऊटवर आदित्य ठाकरेंचा सफेद रंगाचा कुर्त्यामधला फोटो व्हायरल झाला आहे. फोटोच्या शेजारी ऊर्दू भाषेत 'नमस्ते वरळी' असा संदेश लिहिला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत 'भगवा झाला हिरवा' असा संदेश लिहिला आहे.

हेही वाचा: भाजपा खासदाराच्या सुनेला मारहाण, NCP च्या रुपाली चाकणकर धावल्या मदतीला

आदित्य ठाकरेंच्या त्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी नेमकं सत्य समोर आलं. आदित्य ठाकरेंचा हिरव्या फलकावरील व्हायरल झालेला हा फोटो खोटा आहे. प्रत्यक्षात त्या फलकावर एका कंपनीची जाहिरात आहे, आदित्य ठाकरे यांचा फोटोच नाहीय. कोणीतरी मुद्दामून हा खोडसाळपणा केल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ओपनहार्ट सर्जरीवरुन वाजेचा डॉक्टरांबरोबर वाद

आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. या मतदारसंघात मराठीजनांबरोबर अन्य भाषिक मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी सुद्धा आदित्य ठाकरेच्या बॅनरवरील अन्य भाषेतील मजकुरांची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेमध्ये आहे. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याचा विरोधकांकडून नेहमी आरोप केला जातो.

loading image
go to top