कांदळवनांच्या हरकती व सूचनांची चौकशी पूर्ण करा, आदित्य ठाकरेंचे निर्देश

कांदळवनांच्या हरकती व सूचनांची चौकशी पूर्ण करा, आदित्य ठाकरेंचे निर्देश

मुंबई: कांदळवन अधिसूचित करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक घेऊन यासंदर्भात आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील कांदळवन राखीव वन म्हणून अधिसूचित करणेबाबत तसेच या जमिनीवरील हरकती आणि दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करुन कांदळवनाची राखीव वन म्हणून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत प्रगतीचा आढावा घेतला.

आदित्य ठाकरे यांनी कलम 4 अंतर्गत राखीव वन म्हणून अधिसूचित झालेले कांदळवनातील हरकती आणि दाव्यांची चौकशी 15 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच महसूल विभागाच्या ताब्यात असलेले राखीव वन तातडीने वन विभागास हस्तांतरित करण्याची सूचना दिली. या व्यतिरिक्त एम.एम.आर.डी.ए., म्हाडा, एम.आय.डी.सी., सिडको इत्यादी यंत्रणेच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र महसूल विभागास हस्तांतरित न करता परस्पर वन विभागास हस्तांतरित करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांनी आवश्यक सूचना जारी करण्यास सांगितले.

विभागीय आयुक्त यांनी सरकारला अंतिम अधिसूचनेसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करुन अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करण्याचे निर्देश प्रधान सचिव (वने) यांना दिले. या व्यतिरिक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यास आणि वन विभागास हस्तांतरित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त (कोकण) यांना दिले. तसेच अधिसूचित आणि हस्तांतरित कांदळवन क्षेत्राचे आकड्यांचे ताळमेळ महसूल आणि वन विभागाने करुन घेण्यासही सूचित केले. वन विभागास हस्तांतरीत कांदळवनाचे संरक्षणासाठी उपाययोजना करण्याबाबतही निर्णय घेण्यात आले. 

बैठकीस अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, प्रधान सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (पर्यावरण) मनिषा म्हैसकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) वीरेंन्द्र तिवारी,  विभागीय आयुक्त (कोकण विभाग) अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर) मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी (ठाणे) राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी (पालघर) अतिरिक्त जिल्हाधिकारी (रायगड), मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे, उपवनसंरक्षक  (कांदळवन कक्ष, मुंबई) निनु सोमराज उपस्थित होते.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Aditya thackeray Instructions for mangrove forest Complete inquiry january 15

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com