वरळी परिसरातील विकास कामांना मिळणार गती; आदित्य ठाकरे म्हणाले...

Aditya Thackeray
Aditya Thackeraysakal media

मुंबई : मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास (mumbai developments works) आणि पायाभूत सुविधांची (basic facilities) कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya Thackeray) यांनी दिले. ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी परिसरातील विवीध विकास कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Aditya Thackeray
मुंब्रा : कर्तव्यदक्ष टीसीमुळे प्रवाशाला मिळाले हरवलेले पाकीट

वरळी भागातील नेहरू सायंस सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सायानी रोड, गोखले रोड, एनी बेझंट रोड वरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमिपूजन झाले. या कामांना आजपासूनच सुरूवात होत आहे. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनिल शिंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

मुंबईच्या विकासात सर्वांचा सहभाग असावा या ठाकरे यांच्या आवाहनानुसार आज भूमिपूजन होत असलेली कामे राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्या निधीसह फिनिक्स मिल्स, आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहेत. या कामांची पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी माहिती घेतली. या परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करताना टाकाऊ पदार्थांपासून सुंदर कलाकृती निर्माण करून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांचीही पाहणी करून ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com