Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंनी वरळीतून फोडला प्रचाराचा नारळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

'उमेदवारीचा पेपर मी फोडलेला नाही.पेपर तपासणी सुरू आहे.मी कुठून ही लढलो तरी शिवसैनिक म्हणून सगळ्यांनी मतदान करायला हवे' असे आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघात कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.

मुंबई : 'उमेदवारीचा पेपर मी फोडलेला नाही.पेपर तपासणी सुरू आहे.मी कुठून ही लढलो तरी शिवसैनिक म्हणून सगळ्यांनी मतदान करायला हवे' असे आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघात कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.

आचारसंहिता सुरू झाल्यानंतर शिवसेनेने आपला पहिला कार्यकर्ता मेळावा वरळी मतदार संघात घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.'वरळीच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून पुढील पाच वर्षात जगभरातील नेते वरळीचा विकास बघायला येतील' असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.शिवसेनेतील 'इनकमिंग स्किलबेस' आहे. घ्यायचे म्हणून आम्ही कोणालाही घेत नाहीत.शिवसेनेत खारीचा वाटा नसतो,प्रत्येकाचा सारखाच वाटा असतो. महाराष्ट्रात भरपूर विषय आहे,त्यांची सोडवणूक करायची आहे,महाराष्ट्र आपला करायचा आहे यासाठी सर्वांनी शिवसेनच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन ही त्यांनी केलं.

शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी यावेळी बोलतांना 'आदित्य तुम्ही आता तरी पेपर फोडा,वरळी मतदार संघातून तयारी करा,' असं सांगत आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली.'आम्ही आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघाचा उमेदवार म्हणून पाहत आहोत.त्यांना सर्वाधिक मतांनी निवडून देऊ असा विश्वास आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.यावेळी विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर,महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर,उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray started assembly election campaigning in Worli