esakal | १५०० सोसायट्यांमध्ये १००% लसीकरण; BMC कडून विशेष पोस्टर आणि क्यूआर कोड |corona vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

१५०० सोसायट्यांमध्ये १००% लसीकरण; BMC कडून विशेष पोस्टर आणि क्यूआर कोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय भागात १०० टक्के लसीकरण (Corona vaccination) झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना (housing society) पालिकेकडून (bmc) विशेष ओळख दिली जात आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या १०० टक्के नागरिकांचे लसीकरण (people vaccination) पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: रस्ते दुरुस्तीसाठी अखेर फेरनिविदा; एक हजार १२६ कोटी रुपयांची कामे होणार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी १०० टक्के लसीकरण झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर विशेष प्रकारचा लोगो आणि क्यूआर कोड लावण्याची सूचना केली होती. या सूचनेची अंमलबजावणी करत पालिकेने शिल्ड लोगोसह पोस्टर्स आणि क्यूआरकोड तयार केले. सर्व वॉर्डमध्ये हे पोस्टर्स वाटण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागातील सहायक आयुक्तांना त्यांच्या क्षेत्रातील १०० टक्के लसीकरण झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना चिन्हांकित करण्याचे आणि सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर वरील पोस्टर्स आणि क्यूआर कोड लावण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशानंतर अशा गृहनिर्माण सोसायट्यांना ओळखण्याचे काम प्रभाग स्तरावर सुरू झाले आहे.

"आतापर्यंत १५०० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १०० टक्के लोकांचे लसीकरण करण्यात झाले आहे. मुंबईमध्ये ४० हजारांहून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. सुरुवातीला प्रत्येक प्रभागात १००० पोस्टर्स आणि क्यूआर कोड देण्यात आले आहेत. हे पोस्टर अशा सोसायट्यांवर लावले जात आहेत."
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

loading image
go to top