आदित्य ठाकरेंबाबत युवा सेनेत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याभोवती परप्रांतीय मित्रांचा घोळका वाढत आहे. उच्चभ्रूंच्या संगतीत असल्यामुळे आदित्य यांना सर्वसामान्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीबाबत अमर पावले यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केल्यामुळे युवा ब्रिगेडच्या कार्यकारिणीतून त्यांना दूर करण्यात आले आहे. यामुळे नाराज युवा सैनिक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काही कार्यकर्त्यांना व्हॉटस्‌ऍप ग्रुपमधूनही काढल्याने ते नाराज आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेत फूट पडण्याची चिन्हे आहेत. आदित्य हे राजकारणात सक्रिय होण्याआधीपासून भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी म्हणून अमर पावले आणि बाळा कदम काम पाहत होते. पावले यांच्याकडे युवा ब्रिगेडचीही जबाबदारी आहे. आदित्य यांच्यापर्यंत युवा ब्रिगेडच्या कामाची चुकीची माहिती काही युवा सैनिक पोचवत असल्याचा संशय आहे. आदित्य यांच्याशी जवळीक असलेले युवा सेनेचे पदाधिकारी अमेय घोले यांच्याशी मतभेद झाल्यामुळे पावले यांना युवा ब्रिगेडच्या कार्यकारिणीतून काढून टाकल्याचे बोलले जाते.

Web Title: aditya thackeray yuva Sena displeasure