आदिवासी मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. शाळेतील सर्व वर्गांत स्मार्ट बोर्ड आणि व्हर्च्युअल क्‍लासरूम तयार केले आहेत. 

नवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. शाळेतील सर्व वर्गांत स्मार्ट बोर्ड आणि व्हर्च्युअल क्‍लासरूम तयार केले आहेत. 

संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून 10 लाखांचा निधी त्यासाठी दिला होता. त्यानुसार अडवली-भुतवली शाळेच्या नऊ वर्गखोल्या आता व्हर्च्युअल झाल्या आहेत. वर्गातील फळ्यांच्या शेजारी स्मार्ट बोर्ड बसवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पारंपरिक फळ्यांऐवजी स्मार्ट बोर्डमधून शिक्षकांना शिकवता येणार आहे. याआधी शाळेत एकूण पाच वर्गखोल्यांचे काम झाले होते. आता उर्वरित चार खोल्यांचे कामही पूर्ण झाले आहे. वर्गातील स्मार्ट बोर्डचे काम संपले आहे. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलेतून शाळेच्या भिंती रंगवल्या आहेत. रंगांच्या छटांनी भिंतीही बोलू लागल्या आहेत. मंगळवारी आमदार नाईक यांच्या हस्ते चार वर्गखोल्यांतील स्मार्ट क्‍लासरूमचे उद्‌घाटन करण्यात आले. नगरसेवक रमेश डोळे, मुख्याध्यापक भिकाजी सावंत आदी या वेळी उपस्थित होते. नवी मुंबई शहरात वाहत असलेली विकासगंगा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी डिजिटल बोर्डांच्या माध्यमातून स्मार्ट एज्युकेशनचा श्रीगणेशा पालिकेच्या या शाळेत केला आहे, असे नाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या शाळांचा खासगी शाळांप्रमाणे चांगला निकाल लागत असल्याने त्याचे श्रेय त्यांनी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना दिले. 

Web Title: Adivasi children will get digital education