'तुझ्या हातात दोन लाडू कसे...'; मोखाड्यात आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण

Student of ashram school beaten up by teacher: मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेतील नववीतील रूद्राक्ष पागी या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे
'तुझ्या हातात दोन लाडू कसे...'; मोखाड्यात आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण

मोखाडा-  मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेतील  नववीतील रूद्राक्ष पागी या  आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जेवणासाठी झुंबड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून ललित अहिरे या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. समाज माध्यमातून ही घटना उघडकीस आली. त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांतील पदाधिकारी संतप्त झाले आहेत. त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. 

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांर्गत चालविल्या जाणाऱ्या मोखाड्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी  12  जानेवारीला दुपारच्या जेवणाच्यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थीनी एकच झुंबड केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त न लावता येथील शिक्षक ललित एल अहिरे यांने तुझ्या हातात दोन लाडू कसे, असे विचारत रूद्राक्षला काठीने बेदम मारहाण केली.

'तुझ्या हातात दोन लाडू कसे...'; मोखाड्यात आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण
Akola: ऑफिस रेकॉर्ड देण्यास नकार देणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्याला मारहाण अकोलेतील नाईकवाडी कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले, गेली दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांला मारहाण आणि त्याच्या अंगावर उमठलेल्या व्रणाचे फोटो सर्वत्र प्रसारित होत आहेत. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

त्यानंतर आश्रमशाळेतील बाहेर गेलेले अधिक्षक दुर्वे हे शाळेत परत आले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांला रूग्णालयात नेले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या आश्रमशाळेत कुणाचा कुणाशी पायपोस नसून सर्व स्वैर कारभार सुरु आहे. गरीब आदिवासी विद्यार्थी, असल्याने त्याच्या आई वडीलांवर शिक्षका विरोधात तक्रार करु नये यासाठी दबाव टाकला गेल्याची मोठी चर्चा सुरु आहे.

'तुझ्या हातात दोन लाडू कसे...'; मोखाड्यात आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण
RTO Firing Case: आरटीओ गोळीबार प्रकरणातील अधिकाऱ्याला गुन्हे शाखेकडून नोटीस, दाखल करण्यात आला 'हा' गुन्हा

याबाबत कारेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विवेक घरटे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.तसेच शिक्षक एल एल अहिरे यांना या मारहाणी बाबत कडक शब्दात समज दिली असून त्यांनी रुद्राक्षच्या पालकांची माफी मागितली असून पून्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितल्याची माहिती घरटे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com