या जिल्ह्यात प्लास्टिक हटवण्यासाठी निधी

 प्लास्टिकविराेधात जाेरदार माेहिम सुरू आहे.
प्लास्टिकविराेधात जाेरदार माेहिम सुरू आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, गावे, वाड्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. 

प्लास्टिकमुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही गंभीर धोका निर्माण होतो. नाले, गटारांमध्ये प्लास्टीक अडकून राहिल्यास पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्याचा परिणाम पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्लास्टिक बंदी गांर्भीयाने राबवण्याचा निर्णय पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आहे. एक नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबवून जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. 

जिल्हा प्रशासनाने स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक संकलनासाठी 44 केंद्रे उभी करण्यात आली आहेत. प्रबोधन, जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन सुमारे 24 हजार किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. यातील आठ हजार किलो प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत गो ग्रीन कंपनीत पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान पालकमंत्री आदिती तटकरे, माजी उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील यांनी महत्त्वाची भूमीका बजावली. 

हे सुद्धा वाचा : मोदीजी मी चालू शकतो का? 
आदिती तटकरे या प्लास्टिकमुक्त जिल्ह्यासाठी आग्रही आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यास नियोजनमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. 

प्लास्टिक 300 ते 400 वर्षे नष्ट होत नाही. जमिनीत गेल्यास जमिनीचा पोत बिघडतो. त्यामुळे जमिनीच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात. मानवी आरोग्यासह पर्यावरणालाही त्याचा धोका आहे. त्याचा विचार करता प्लास्टीकबंदीची गरज आहे. 
- जयवंत गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com