मैदानांतील बांधकामांना चाप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या मैदानांवर यापुढे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे या मैदानांवर उभी राहणारी समाजमंदिरे, व्यायामशाळा आणि बालवाड्यांवर यापुढे दिसणार नाहीत. आतापर्यंत किमान ७०० ते ८०० मैदानांवर अशा प्रकारचे बांधकाम झाले आहे.

मुंबईत महापालिकेची दीड ते दोन हजार मैदाने आहेत. या मैदानांच्या कोपऱ्यात लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून व्यासपीठ, व्यायामशाळा, समाजमंदिरे; तसेच बालवाड्या बांधण्यात आल्या आहेत. मुंबईत मोकळ्या जागेची कमतरता असताना या बांधकामामुळे मैदाने अधिकच लहान होतात. या पार्श्‍वभूमीवर भविष्यात मैदानांवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले.

दरम्यान, मैदानांवर क्रिकेटबरोबरच इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरात क्रिकेट, फुटबॉलबरोबरच कबड्डी, खो-खो अशा खेळांसाठीही मैदाने तयार करण्यात येणार आहेत. महापालिका अंधेरीत क्रीडा संकुल उभारत आहे. तेथे कबड्डीचे मैदानही तयार करण्यात येणार आहे. मैदानांची जागा मैदानी खेळांसाठी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मैदानांमधून ५७० कोटी लिटर पाणी 
पालिका सर्व मैदानांत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यात पालिकेच्या ताब्यात येणाऱ्या मैदानांचा विचार केल्यास त्यातून ५७० कोटी लिटर पाणी उपलब्ध होईल. हे पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापरता येऊ शकेल.

Web Title: The administration of the municipal corporation decided not to allow any kind of construction on ground