Tree Cutting
sakal
मुंबई : विकास आणि पुनर्विकास प्रकल्पांसाठी मुंबईत गेल्या पाच महिन्यांत तब्बल ७,६३३ झाडे तोडण्यास किंवा पुनर्रोपणासाठी हटवण्यास परवानगी देण्यात आली आहे. झाडे हटवल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाकडून दिले जातात. मात्र, मुंबईत पुनर्रोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का, पुनर्रोपित झाडे किती जगतात, असे सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत.