Alibag News : दरडप्रवण गावांवर प्रशासनाचा राहणार वॉच; अधिकाऱ्यांकडे दिले पालकत्‍व

अतिवृष्टीमुळे अलिबाग तालुक्यातील दरडप्रवण गावांवरही धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
Landslide
LandslideSakal

अलिबाग - अतिवृष्टीमुळे अलिबाग तालुक्यातील दरडप्रवण गावांवरही धोक्याची घंटा वाजू लागली आहे. या गावांमध्ये कोणत्या तात्पुरत्या उपाययोजना करता येतील याची पाहणी अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी केली.

दरड कोसळल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच कोणते पर्याय निवडता येतील, याची चाचपणी केली जात आहे. त्याचबरोबर आपत्ती संदर्भात जनजागृतीवर भर देण्यात येत असून तत्काळ स्थलांतरासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

तालुक्यातील वेलटवाडी, ताजपूर, चिंचोटी, वाडगाव, सोगाव व फुफादेवी पाडा, डांगी अशी ७ दरडप्रवण गावे आहेत. यातील ६ गावांमध्ये लोकवस्ती आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची जास्त शक्यता आहे, अशाच परिसरात हे लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार असल्याने प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरुवात केली.

अतिवृष्टीच्या दरम्यान येथील भौगोलिक परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जाणार असून यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकात पंचायत समिती विस्तार अधिकारी सुभांगी नाखले यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. यासह अन्य सहा पथकांचे प्रमुख म्हणून मंडळ अधिकाऱ्यांच्या नियुक्ता करण्यात आलेल्या आहेत.

पथकात तलाठी, ग्रामसेवक कृषी सेवक, कोतवाल व पोलिस पाटील यांचीही नियुक्‍त केली आहे. पथकातील प्रमुखांना दरडग्रस्त गावातील परिस्थितीवर लक्ष देण्यासाठी तसेच तेथील घडामोडींचा अहवाल कार्यालयास देण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला असून ०२१४१-२२२०५४ व ८२७५ २७८२१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अतिवृष्टीच्या वेळी ग्रामस्थांनी खास करून रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. सदर गावात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता गृहीत धरुन तात्पुरते निवारे शाळा, कॉलेज समाज मंदिर, या ठिकाळी स्‍थलांतरित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

- विक्रम पाटील, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com