पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द

advertisement release for teacher recruitment on pavitra portal
advertisement release for teacher recruitment on pavitra portal

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील 10 हजार 1 शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

यामध्ये अनुसूचित जाती- 1 हजार 704 , अनुसूचित जमाती- 2 हजार 147, अनुसूचित जमाती (पेसा)- 525, व्हि. जे. ए.- 407, एन. टि. बी.- 240, एन. टी. सी- 240, एन. टी. डी.- 199, इमाव- 1 हजार 712, इ. डब्ल्यू. एस- 640, एस. बी. सी.- 209, एस. ई. बी. सी.- 1 हजार 154, सर्व साधारण- 924 या संवर्गातील जागांचा समावेश आहे.

सुमारे 5 हजार हून अधिक शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. 6 जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत 50 टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.
पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही  गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परीश्रम करुन काम पूर्ण केले आहे.

शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. 2 मार्च 2019 रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com