
उल्हासनगर : मराठी भाषेच्या अधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर, संघटनांवर आणि राजकीय पक्षांवर राज्य सरकारकडून गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हे आंदोलन वेगाने पसरत असल्यामुळे सरकारकडून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे झाल्यास महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या उल्हासनगरातील स्वराज्य संघटनेचा विधी विभाग कार्यकर्त्यांची, संघटनांची, पक्षांची आणि नागरिकांची केस विनामूल्य लढणार अशी भूमिका स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा ॲड. जय गायकवाड यांनी जाहीर केली आहे.