ऐरोलीचा ॲथलेटिक ट्रॅक दृष्टिक्षेपात

ऐरोलीचा ॲथलेटिक ट्रॅक दृष्टिक्षेपात
ऐरोलीचा ॲथलेटिक ट्रॅक दृष्टिक्षेपात

नवी मुंबई : नवी मुंबईतील होतकरू ॲथलिट्‌सना चमकदार कामगिरी करता यावी, याकरिता पालिकेने ऐरोलीमध्ये प्रस्तावित केलेल्या सिंथेटीक ट्रॅककडे लक्ष वेधण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्या आहेत. तसेच या ट्रॅकचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद नेमण्याच्या सूचनाही या वेळी आयुक्तांनी दिल्या आहेत. हा प्रस्ताव अनेक महिन्यांपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतर, त्याचा प्रशासनालाच विसर पडला होता; मात्र आयुक्त मिसाळ यांनी त्यावर प्रकाश टाकला आहे.  

नवी मुंबईच्या निर्मितीपासूनच शहरात विविध जाती आणि धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहरात दिग्गज धावपटू आणि खेळाडूंचे प्रमाण अधिक आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात. यासाठी पालिकेने ऐरोलीमध्ये ॲथलेटिक ट्रॅक उभारण्यासाठी तरतूद केली आहे. ऐरोली, सेक्‍टर १९ येथील भूखंड क्रमांक ७४ वरील सुमारे ७० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत हा धावण्याचा ८ लेनचा ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. १५० मीटर लांब आणि ८० मीटर रुंद असा सुमारे ४०० मीटरचा हा सिंथेटिक ट्रॅक तयार केला जाणार आहे. शहरात जागतिक पातळीवरील धावपटू तयार व्हावेत, याकरिता खास परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार या ट्रॅकची उभारणी केली जाणार आहे. २०१८ मध्ये या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही. जागा असूनही प्रत्यक्षात त्यावर ट्रॅकचे काम अद्याप सुरू न झाल्याने, नवी मुंबईत राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज धावपटूंना रस्ते, पदपथ व इतर खासगी मैदानांवर सराव करावा लागत आहे.

कांदळवनांचा अडथळा
ट्रॅकची उभारणी करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे; परंतु, भूखंडातील काही भाग कांदळवनांमध्ये मोडत आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी घ्यावी लागणार आहे. हा अडसर दूर केल्यास ट्रॅकची उभारणी करता येईल, अशी माहिती अभियांत्रिकी विभागाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com