

BMC Opposition Leader Post
ESakal
मिलिंद तांबे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईच्या राजकारणाला एक नवे आणि ऐतिहासिक वळण दिले आहे. तब्बल तीन दशकांनंतर आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा (ठाकरे) सत्तेत नाही, तर विरोधी पक्षनेते म्हणून डरकाळी फोडताना दिसणार आहे, तर दुसऱ्या बाजूला महायुतीला मिळालेल्या बहुमतामुळे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे विरोधी पक्षनेते पद आता संपुष्टात येणार असून, शिवसेना (ठाकरे) अधिकृतपणे मुख्य विरोधी पक्षाची धुरा सांभाळणार आहे.