
Snakebite
ESakal
डोंबिवली : खंबाळपाडा येथे आईसह नातेवाईकांकडे आलेल्या चार वर्षाची चिमुरडी प्राणवी भोईर हिचा सर्प दंशाने मृत्यु झाल्याची घटना रविवारी घडली. मुलीची मावशी श्रुती ठाकुर हीच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. तिची मृत्युशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली असून मंगळवारी श्रुती अनिल ठाकुर (वय 24) मृत्यू झाला. महिनाभरावर श्रुती चे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या घटनेमुळे ठाकुर परिवाराच्या आनंदावर विरजन पडले असून संपूर्ण परिसरावर एक शोककळा पसरली आहे.