40 तासांनंतर महाड येथील शोधकार्य थांबले 16 जणांचा मृत्यू; दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश

सुनिल पाटकर
Wednesday, 26 August 2020

महाड येथील "तारिक गार्डन' इमारत कोसळल्यानंतर तब्बल 40 तासांनंतर शोधकार्य बुधवारी(ता.26) दुपारी पूर्ण झाले.

महाड ः महाड येथील "तारिक गार्डन' इमारत कोसळल्यानंतर तब्बल 40 तासांनंतर शोधकार्य बुधवारी(ता.26) दुपारी पूर्ण झाले. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान आज दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. 

फोर्ट येथील बाहूबली इमारतीत आगीचा भडका; एकाची प्रकृती गंभीर

सोमवारी (ता.24) सायंकाळी सहा वाजता महाड शहरातील "तारिक गार्डन' पाच मजली निवासी इमारत कोसळली. या इमारतीत 45 सदनिका असल्याने अनेकजण त्यात दबल्या गेल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाने तातडीने शोधकार्याला सुरवात करण्यात आली. तीन दिवसांपासून एनडीआरएफ, नगरपालिका, महसूल, आरोग्य तसेच पोलिस यंत्रणेच्या साह्याने शोधकार्य सुरु होते. तब्बल 40 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांचा जीव वाचविण्यात यंत्रणेला यश आले. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 7 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. मंगळवारी शोधकार्य सुरु असताना 

19 तासाच्या प्रयत्नानंतर मोहमद बांगी या चार वर्षीय मुलाला वाचविण्यात यश आले. तसेच 27 तासांनंतर 62 वर्षीय महीरुनिस्सा अब्दुल हमीद काझी या महिलेला ढिगाऱ्याखालून सुरक्षित काढण्यात यश आल्याची उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. 

बेघरांना तात्पुरता निवारा 
या दुर्घटनेत ज्यांचे घर उद्धस्त झाले त्यांना तात्पुरता निवारा म्हणून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. या इमारतीमध्ये 45 सदनिका होत्या; मात्र त्यातील 18 सदनिका बंद होत्या. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा 

"अल कासीम' इमारत खाली करण्याचे आदेश 
महाड शहरात अनेक इमारती धोकादायक आहेत. पावसाळ्यापूर्वी महाड नगरपालिकेने जवळपास दोन इमारतींना धोकादायक असल्याने नोटीस बजावली होती. मात्र आजही या इमारतीत रहिवाशी राहत आहे. त्यातील "अल कासीम' ही इमारत धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांना 11 ऑगस्टला इमारत खाली करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, "तारिक गार्डन' दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने आज शहरातील "अल कासीम' या इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्याचे आदेश दिले.

अभिनेत्री कंगना रानौतने केली बॉलिवूडमधील सर्व कलाकारांची नारकोटिक्स टेस्ट करण्याची मागणी

बाहूबली धामणे ला अटक

महाड येथीलं तारीक गार्डन दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांपैकी आरसीसी सल्लागार बाहूबली धामणे यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे . दुर्घटना प्रकरणी तारीक गार्डन इमारतीचे विकासक फारुक महामुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स तळोजा नवी मुंबई ) , वास्तूविशारद गौरव शहा ( व्हर्टीकल आर्कीटेक्ट ॲंन्ड कन्सल्टंसी नवी मुंबई ), आर सी सी डिझायनर्स बाहुबली  धावणे ( श्रावणी कंन्सल्टन्सी मुंबई ) , महाड न. प. चे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे, आणि तत्कालीन न प मुख्याधिकारी दिपक झुंजाड यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुब्यवधाचा  गुन्हा दाखल  करण्यात आलेला आहे . यातील बाहूबली धामणे यांना आज अटक करून न्याया लयात हजर करण्यात आली त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 40 hours, the search stopped at Mahad, killing 16 people; Success in getting two people out alive

टॉपिकस