पालकांच्या पायाखालची सरकली जमीन, जेंव्हा त्यांना आपल्या मुलीच्या 'या' चॅटबद्दल समजलं  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

'माझ्या ब्राकडे पाहून त्यांनी अश्लील शेरेबाजी केली', 'तू अशा भडक रंगाच्या ब्रा वापरू नको, असं ते म्हणाले'

मुंबई: देशात कोरोनानंतर सध्या कुठलं प्रकरण चर्चेत असेल तर ते Bois Locker Room. या प्रकरणानं शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाची झोप उडवली आहे. मात्र आता तसाच प्रकार नवी मुंबईच्या एका शाळेतून समोर आलाय. या शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या इंस्टाग्राम ग्रुपवर एका शिक्षकानं मुलींना अश्लील कमेंट केल्याप्रकरणी चर्चा करण्यात आली आणि त्यांनतर या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी मुंबईतल्या या CBSE शाळेच्या काही विद्यार्थ्यांच्या प्रायव्हेट इन्स्टाग्राम चॅटग्रूपवर एका शिक्षकाच्या वर्तनाविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मुलींच्या ब्राकडे पाहून अश्लील कमेंट करणं, मुलांना नको तिथे स्पर्श करणं असे उद्योग एक शिक्षक तब्बल ५ वर्षांपासून करतो आहे असे अनुभव या चॅटग्रूपवर काही विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यापैकी दोन विद्यार्थ्यांनी शाळेकडे ई-मेल करून तक्रार केली आहे.

सायन हॉस्पिटलच्या डीन यांना मृतदेह प्रकरण भोवलं, सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

'माझ्या ब्राकडे पाहून त्यांनी अश्लील शेरेबाजी केली', 'तू अशा भडक रंगाच्या ब्रा वापरू नको, असं ते म्हणाले' अशा पद्धतीच्या तक्रारी विद्यार्थिनींनी प्रायव्हेट चॅटवर केल्या. यानंतर हे प्रकरण जगासमोर आलं. या शिक्षकाच्या लिस्टवर फक्त विद्यार्थिनीच नाही विद्यार्थीही आहेत. त्या शिक्षकाने आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावल्याचं एका विद्यार्थ्यानं या ग्रुपचॅटमध्ये लिहिलंय. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.

यापुढे क्रेडिट कार्डनं इंटरनेटवरील 'त्या' क्लिप्स खरेदी करता येणार नाही?

दरम्यान हा आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मीच एका विद्यार्थिनी आणि तिच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे असं या शिक्षकानं म्हंटलं आहे. मात्र पोलिसांनी आणि सेक्शुअल हरॅस्मेंट कमिटीनं याची गंभीर दखल घेतली आहे. चौकशी सुरू केली. मात्र बदनामी होण्याच्या भीतीनं कोणीही समोर यायला तयार नाहीये.

after bois locker room and girls locker room chat from on of the navi mumbais students shook parents


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after bois locker room and girls locker room chat from on of the navi mumbais students shook parents