Mumbai Local: मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गाला फटका! मोटरमन वेळेत न पोहोचल्याने २२ लोकल फेऱ्या रद्द, सकाळीच प्रवाशांचे हाल

Harbour Railway: मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गाला फटका बसला असल्याचे समोर आले आहे. २२ लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याची माहिती मिळाली आहे.
Harbour Railway Disruption

Harbour Railway Disruption

ESakal

Updated on: 

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे विस्कळित झालेल्या लोकल सेवेचा फटका हार्बर मार्गालाही बसला. मुख्य मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने मोटरमन सीएसएमटी येथे वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे दुपारच्या सुमारास हार्बर मार्गावरील २२ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावल्या. लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com