esakal | मुंबईत घर खरेदीला पुन्हा बहर; गतमहिन्याच्या तुलनेत खरेदीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत घर खरेदीला पुन्हा बहर; गतमहिन्याच्या तुलनेत खरेदीत वाढ

मुंबईत घर खरेदीला पुन्हा बहर; गतमहिन्याच्या तुलनेत खरेदीत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनचा अनेक व्यवसायांवर नकारात्मक परिणाम झाला, मात्र अनलॉकच्या प्रक्रियेनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असून मुंबईत घर खरेदीला सुगीचे दिवस आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. सप्टेंबरमध्ये मुंबईत ७ हजार ७१६ घरे विकली गेली असून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्याच्या तिजोरीत ५२४ कोटींचा महसूल गोळा झाला.

मुंबईत कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम विविध व्यवसायांवर पाहायला मिळाला. गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत लागू केली होती. या कालावधीत मोठी घर खरेदी झाली. सरकारने दिलेली सवलत संपुष्टात आली तरी मुंबईत गृहनिर्माणमधील उलाढाल वाढत चालली आहे.

एकीकडे मुंबईत घर खरेदी वाढत असताना जुलै, ऑगस्टच्या तुलनेत राज्यात सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी घट पाहायला मिळाली. सप्टेंबरमध्ये राज्यात ९६ हजार ७४० घरांची विक्री झाली. या व्यवहारामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत १ हजार ६२३ कोटींचा महसूल जमा झाला.

५२४ कोटींचा महसूल

मुंबईतील घरविक्रीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईत ७ हजार ७१६ घरांची विक्री झाली होती आणि यातून ५२४ कोटींचा महसूल मिळाला. तर जुलैमध्ये ६ हजार ७८४ घरांची विक्री होऊन यातून ४२० कोटींचा महसूल जमा झाला होता. सप्टेंबरमध्ये घरविक्री सुमारे १ हजारांनी वाढली असून महसूलही १०० कोटीहून अधिक प्राप्त झाला आहे. राज्यात जुलै महिन्यात १ लाख ३६ हजार तर ऑगस्टमध्ये १ लाख ४ हजार ५६ घरे विकली गेली होती.

loading image
go to top