सावधान! कोरोनानंतर मुंबईवर आणखी एक संकट घोंघावतय

सावधान! कोरोनानंतर मुंबईवर आणखी एक संकट घोंघावतय

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असतानाच मुंबईवर आणखी एक संकट घोंघावत आहे. कोरोनानंतर आता मुंबईत मलेरियाची साथ पसरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे रुग्ण अधिक सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता आणखीनच वाढली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरात गेल्या वर्षी जुलै महिन्यात ४३८ मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते. यंदा मात्र ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे ८७२ रुग्ण सापडले आहेत.

दरवर्षी जून आणि जुलैमध्ये मलेरियाचे रुग्णसंख्या दुप्पट होत असते. यंदाही जुलैमध्ये मलेरियाचा आकडा दुप्पट वाढला आहे. त्यात दोन जणांनाच मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनाचं संकटही डोक्यावरुन कमी झालेलं नाही.

दरम्यान मलेरिया पाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळून आलेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत डेंग्यूचे २९ रुग्ण सापडले होते. यंदा जुलैमध्ये ११ रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यूचेही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २०१९ च्या जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या ९९४ रुग्ण होते त्यात आता केवळ ५३ आहेत.

दुसरीकडे, पावसामुळे मुंबईत आजारांचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना रुग्णांनी रुग्णालये व्यापल्यामुळे बिगर कोरोना रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर मुंबई महापालिकेने एक उपाय काढलाय. मुंबई पालिका आता कोविड केअर सेंटरचं रुपांतर नॉन कोविड सेंटरमध्ये करणार आहे, जिथे डेंग्यू,  मलेरिया आणि इतर आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

महापालिकेच्या राजावाडी, शताब्दी, भाभा हॉस्पिटल अशा १६ रुग्णालयांपैकी वांद्रे आणि कुर्ला येथील भाभा हॉस्पिटल, राजावाडी, जोगेश्वरी ट्रॉमा हॉस्पिटल आणि गोवंडी शताब्दी रुग्णालय कोविड आणि नॉन कोविडसाठी ठेवण्यात येतील. तर उर्वरित सर्व फक्त बिगर कोरोनाबाधितांसाठीच असणार आहेत.

पालिका यंत्रणा पूर्णपणे यावर काम करत आहे. फक्त लोकांना जे नियम दिले आहेत त्याचे पालन त्यांनी करावे. कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसंच मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होऊ नयेत म्हणून झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये पालिकेने फवारणी केली आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

After covid monsoon disease Malaria Dengue Patient increase Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com