esakal | काय सांगता! गणेशोत्सवाच्या स्पेशल ट्रेनमध्ये केवळ 'इतके'च प्रवासी
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! गणेशोत्सवाच्या स्पेशल ट्रेनमध्ये केवळ 'इतके'च प्रवासी

मध्य रेल्वेवरून विशेष गाड्या रवाना होताच पुढील गाड्याचंही आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान महत्त्वाचं म्हणजे, या स्पेशल रेल्वे गाडयांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतंय. 

काय सांगता! गणेशोत्सवाच्या स्पेशल ट्रेनमध्ये केवळ 'इतके'च प्रवासी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः १५ ऑगस्टपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेनं १६२ ट्रेन सोडण्याची योजना आखली आहे. तसंच या ट्रेनचं बुकिंग देखील शनिवारपासून सुरु करण्यात आलं आहे. यातील काही ट्रेन ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहेत. मध्य रेल्वेवरून विशेष गाड्या रवाना होताच पुढील गाड्याचंही आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान महत्त्वाचं म्हणजे, या स्पेशल रेल्वे गाडयांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतंय. 

शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला जाणारी पहिली ट्रेन रात्री साडे आठ वाजता सुटली. या पूर्ण रेल्वेत फक्त ६ प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बसले तर ठाणे आणि पनवेल येथून २५ प्रवाशांनीच आरक्षण केले होते. १८ डब्यांच्या या गाडीत केवळ ३० प्रवाशीच होते.

विशेष रेल्वे गाड्यांचं २२ ऑगस्टपर्यंतचे आरक्षण केवळ २५ टक्क्यांपर्यंतच झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक गाडीला १ हजार ६३८ प्रवाशांपैकी सरासरी ४०० प्रवासी मिळालेत. क्वांरटाईनच्या अटी आणि राज्य सरकारनं उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे काही जण चाकरमानी खासगी वाहनांनी गावाकडे रवाना झाले. राज्य सरकारनं जर आधी घेतला असता किंवा या गाड्या यापूर्वीच सोडल्या असत्या तर याला चांगला प्रतिसाद वाढला असता. 

हेही वाचाः  'या' पुलावरून प्रवास करत असाल तर सावधान, पालिकेनं केलं आवाहन

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाकरता स्पेशल ट्रेन्स सोडण्याची घोषणा झाली आणि चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र या ट्रेन्सला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कोकणासाठी चार विशेष रेल्वे रवाना झाल्या. या गाडयांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ हजार ४८ प्रवाशांनी आरक्षण केलं होतं. सीएसएमटी येथून रात्री ११.०५ वाजता सावंतवाडीला जाणाऱ्या गाडी क्रमांक ०११०१ साठी सायंकाळी ६ पर्यंत ४४४ प्रवाशांनी, त्यापाठोपाठ एलटीटीहून कुडाळला जाणाऱ्या गाडी क्रमांक ०११०३ साठी ४२८ प्रवाशांना तिकीट मिळाले होते. ही गाडी रात्री ११.५० वाजता रवाना होणार होती. 

अधिक वाचाः  मुंबईकरांनो काळजी घ्या! येत्या बुधवारपर्यंत 'ही' असेल पावसाची स्थिती...ठाणे, पालघरही अलर्टवर

रात्री १० वाजता सीएसएमटीहून सावंतवाडीसाठी सुटणाऱ्या गाडी क्रमांक ०११०५ ला केवळ १२२ प्रवासी आणि एलटीटीहून रत्नागिरीसाठी रात्री १०.३० वाजता सुटणाऱ्या गाडी क्रमांक ०११०७ लाही ५४ प्रवासीच होते. पहिल्या ट्रेन्सला प्रतिसाद कमी मिळत असला तरी यापुढील ट्रेनला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे.

Ganpati festival special holiday train less response only 30 passgener