कोविड चाचणी केल्यानंतरच मुंबईत प्रवेश

पालिका सादर करणार ऍक्‍शन प्लान
covid test
covid test file photo

मुंबई: मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्याला महानगर पालिका प्राधान्य देणार आहे. रेल्वे स्थानकांवरील चाचण्याची संख्या वाढवण्यावर भर देण्याबरोबरच महामुंबईच्या नाक्यांवर सुरु असलेली तपासणीही वाढविण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. विशेषत: कुंभमेळ्यातून येणाऱ्यांवर काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे.

मुंबईसह राज्यात लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोविडच्या संसर्गाला अटकाव झाला असला तरी तो पुरेसा नाही तसेच,लॉकडाऊन जास्त काळ लांबवणे शक्‍य नाही. त्यामुळे आता महानगर पालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. हा कृती आराखडा सोमवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी असा नवे उपाय केले जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुंभमेळ्यातून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करुन त्यांचे विगलकीण होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यावर महापालिका प्रशासनसही कुंभमेळ्यातून येणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवणार आहे. काही इतर राज्यांनी बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे चाचणी बंधनकारक केली आहे.त्यात कुंभमेळ्यातून येणाऱ्यांसाठी निर्बंध आहेत. मुंबईतही आता काटेकोरपणे त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

covid test
कोरोनामूळे प्रवासी धास्तावले; मुंबई पुण्याकडे रेल्वे धावताहेत रिकाम्याच

मुख्य रेल्वे स्थानकांवर चाचण्या केल्या जात आहेत. मात्र,त्यांची क्षमता आता वाढविण्यात येणार आहे तसेच,राज्य परीवहन सेवेच्या डेपोमध्येही चाचण्याची संख्या वाढविण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होईल याची खबरदारी घेण्यात येणार आहे तसेच,रस्ते मार्गाने मुंबईत येणाऱ्यांची महामुंबईच्या नाक्‍यावर तपासणी सुरु आहे. ती वाढविण्याची विनंतीही राज्य सरकारला करण्यात येणार आहे, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com