
मुंबई : कबुतरांच्या विष्ठेचा त्रास, पिसांचे विखुरलेपणा आणि त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार लक्षात घेता, महापालिकेने कबुतरखान्यांविरोधातील मोहिमेला वेग दिला आहे. शनिवारी रात्री दादर येथील कबुतरखाना ताडपत्री टाकून बंदिस्त केल्यानंतर आता फोर्ट परिसरातील जीपीओ समोरील कबुतरखाना बंदिस्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.