वर्षभरानंतर श्रीनिवास परदेशातून आला आणि त्यांच्यात झालं...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45) यास पनवेल सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जानेवारी 2016 मध्ये खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये ही घटना घडली होती. 

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45) यास पनवेल सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जानेवारी 2016 मध्ये खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये ही घटना घडली होती. 

ही बातमी वाचली का? भिवंडीतील निर्भयाला मिळाला महिनाभरात न्याय

या गुन्ह्यातील आरोपी श्रीनिवास हा शिक्षिका असलेली पत्नी पुष्पा व दोन मुलांसह खारघरमधील केंद्रीय विहार वसाहतीत राहत होता. मात्र, त्यावेळी तो कामानिमित्त परदेशात गेला होता. वर्षभरानंतर श्रीनिवास परदेशातून खारघर येथील घरी आल्यानंतर त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे या दोघा पती-पत्नींमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. या भांडणामध्ये श्रीनिवास याने रागाच्या भरात पुष्पाच्या डोक्‍यामध्ये लोखंडी हातोड्याने प्रहार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर श्रीनिवासने आपल्या 6 वर्षीय मुलाला सोबत घेऊन ठाणे येथील नातेवाईकांचे घर गाठले होते. त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली होती. 

ही बातमी वाचली का? वाहनांसाठी आकर्षक क्रमांक ...नको रे बाबा!

खारघर पोलिसांनी श्रीनिवासला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करून अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू होती. नंतर या खटल्याची सुनावणी पनवेल येथील सत्र न्यायालयात झाली. ही घटना रागाच्या भरात घडल्याचे साक्षी पुराव्यावरून आढळून आल्याने न्या. राजेश अस्मार यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यावरून श्रीनिवास याला 5 वर्षे सक्त मजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या गुह्यातील आरोपी अद्याप कारागृहात आहे.

 In connection with the murder of wife Husband punished to five years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In connection with the murder of wife Husband punished to five years