एकीकडे वडिलांचा मृतदेह, दुसरीकडे परीक्षा; तरीही विद्यार्थ्याने मिळवले यश; कुटुंबीयांच्या डोळ्यात तरळले अश्रू 

जीवन तांबे
Friday, 31 July 2020

ऐन दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिक्षाला बसावे की, नाही असा प्रश्न मनात घोळत असतानाच बापाने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याने सरळ परिक्षा केंद्र गाठले.  

चेंबूर : ऐन दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिक्षाला बसावे की, नाही असा प्रश्न मनात घोळत असतानाच बापाने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याने सरळ परिक्षा केंद्र गाठले. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर वडिलांना अग्नी दिला. चेंबूरमधील संदेश साळवे या विद्यार्थ्याची ही कहाणी. दहावीच्या निकालात 53.20 टक्के गुण मिळवत तो उत्तीर्ण झाला. तेव्हा तो दिवस आठवून आजी, आजोबा व आई आणि संदेशच्याही डोळ्यात पाणी आले. 

आयआयटी मुंबईप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रास आदेश

चेंबूर टिळक नगर परिसरातील पंचशील नगर एसआरए इमारतीतील आठव्या मजल्यावर राहणारे परमेश्वर साळवे यांचा गेल्यावर्षी मार्चमध्ये कर्करोगाने निधन झाले. आपले आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले. त्याचदिवशी परमेश्वर यांचा मुलगा संदेशचा दहावी परीक्षेचा पेपर होता. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे परीक्षा अशा विचित्र मनस्थितीत असलेल्या संदेशने प्रथम दुःख बाजूला सारून दहावीचा पेपर देण्याचे ठरवले आणि परीक्षा केंद्र गाठले. परिक्षा देऊन आल्यानंतर कुटुंबांनी त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले होते.

आयटीआयची प्रवेश प्रवेशप्रक्रिया 1 ऑगस्टपासून; यंदा तब्बल 'इतक्या' जागा उपलब्ध....

पोलिस होण्याची इच्छा
संदेश आज दहावी परिक्षेत 53.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने घरातील सर्वांच्यांच डोळ्यात अश्रू तरळले. वडिलांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र याच्या जोरावरच मी दहावी पास झालो आहे. आता बारावी उत्तीर्ण होऊन पोलिस दलात भरती व्हायचे आहे, अशी इच्छा संदेशने व्यक्त केली आहे

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after the death of father Yet the success achieved by the student; Tears welled up in the eyes of the family