पालघर पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये गटबाजी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पाचव्या क्रमांकावर फेकले जाणे कॉंग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली असून, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याविरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत. 

मोहन यांनी राज्याचे कामकाज योग्य रीतीने हाताळावे, अशी मागणी पक्षांतर्गत होत आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नियुक्‍तीवर नाराज असलेल्या गटानेही नेतृत्व बदला, अशी मागणी सुरू केली आहे. यासंदर्भातला नाराज गट येत्या दिवसांत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

मोहन प्रकाश हे राहुल यांच्या प्रमुख सल्लागारातील एक आहेत. बिहारमध्ये त्यांच्याच पुढाकाराने महाआघाडी झाली होती, त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे; मात्र येथे कॉंग्रेसचे सध्या बरे सुरू नसल्याची तक्रार आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघ राष्ट्रवादीकडे सोपवण्याचा निर्णय अयोग्य असून, कॉंग्रेसने ती लढवणे गरजेचे होते, असे एका गटाला वाटते. 

अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या निवडणुकीत यश मिळवले असले तरी ते राज्यभरात फारसे प्रभावी नाहीत, अशी विरोधी गटाची तक्रार आहे. अशोक यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देण्यात यावी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सामना करण्याची क्षमता केवळ त्यांच्याच व्यक्‍तिमत्त्वात आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्याची मागणी होत आहे. 

बविआशी आघाडी का नाही? 
पालघर पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असता तर योग्य ठरले असते, असा सूर कॉंग्रेसमध्ये व्यक्‍त केला जात आहे. बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी आम्ही कॉंग्रेसच्या पाठिंब्याची प्रतीक्षा केली, असे विधान केले होते. जाधव एकेकाळी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडूनही आले होते; मात्र अशोक चव्हाण यांनी बविआला पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळेच राजेंद्र गावित दूर गेले, असे दिल्लीला कळवण्यात आले आहे. 

Web Title: After the defeat of the Palghar Congress politics