संजय राऊत, शरद पवार यांच्या फोनचं टॅपिंग ? ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या  काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने याची चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसनेते दिगविजय सिंह यांच्या तक्रारीनंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने या चौकशीचे आदेश दिलेत

मोठी बातमी -  महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...

भाजप सरकारच्या काळात ज्यांनी विरोधात भूमिका मांडली, जे विरोधात बोलत होते याचसोबत भीमा कोरेगाववेळी देखील फोन टॅपिंग केलं गेल्याचं बोललं जात होतं. पेगॅसिस या स्पायवेअरचा वापर करत हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप दिगविजय सिंह यांनी केला होता. एक अधिकारी थेट इस्राईलला जाऊन हे स्पायवेअर घेऊन आल्याचं बोललं जातंय. 

मोठी बातमी - "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ही बातमी समोर येतेय. यामध्ये आता महाराष्ट्र सायबर सेलच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे असं सांगण्यात आलंय. महाराष्ट्राच्या गृहखात्याने तसे आदेश दिल्याचं समजतंय. यामध्ये संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे याचसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक नेत्यांवर नजर ठेवली जात होती, फोन टॅप केले जात होते असे आरोप केले जातायत आणि म्हणूनच आता याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

after digvijay singhs complain maharashtra vikas aaghadi to investigate in phone tapping during bjp government  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after digvijay singhs complain maharashtra vikas aaghadi to investigate in phone tapping during bjp government