esakal | "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"
sakal

बोलून बातमी शोधा

"राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

"राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईतील नेस्को मैदानात मनसेच्या महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशा प्रकारच्या महाअधिवेशनाचं आयोजन केलंय. सकाळी दहा वाजता या महाअधिवेशनाला सुरवात झाली. या कार्यक्रमातून सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवमुद्रेचा वापर केलाय. या वापरावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. याचसोबत दिवसभर सुरु असलेल्या अधिवेशनात अनेक नेते मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, वेगेवेगेळे ठराव याठिकाणी सादर केले जातायत. 

मोठी बातमी - नवी मुंबई, ठाण्याच्या वेशीवर 'घडतोय' हा प्रकार!

आजच्या कार्यक्रमाची एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांचं राजकील लॉन्चिंग देखील केलं गेलं. त्यांनी सत्तावीस वर्षात पहिल्यांदा स्टेजवर येत बोलत असल्याचं वक्तव्य केलं. अमित ठाकरे यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांसोबत शिक्षण विषयक ठराव मांडला. 

"राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"  

अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रखर हिंदुत्त्वाकडे वाटचाल करणार हे आता स्पष्ट झालंय. दरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयावर भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी गंभीर आरोप केलाय. राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांनीच हे षडयंत्र आखलं असल्याचं म्हटलंय. शिवसेनेने हिरवेपणा स्विकारल्यामुळे हिंदू मताचा फायदा भाजपाला होईल. हा फायदा भाजपाला होऊ नये म्हणून शरद पवार यांनी राजकीय खेळी केल्याचं गणेश हाके म्हणालेत.

मोठी बातमी -  अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले

भाजपाला अशा मित्रांची गरज नाही

मनसेच्या मैत्रीच्या संदर्भात बोलताना, भाजपाला अशा मित्रांची गरज नाही. भाजप स्वतःच्या ताकदीवर पार्टी वाढवू शकते, मोठी होऊ शकते आणि अशा तकलादू मित्राची गरज नाही भारतीय जनता पक्षाला नाही असं देखील गणेश हाके यांनी म्हटलंय. हिंदू मतांचं विभाजन करण्यासाठी शरद पवारांनी हे षडयंत्र रचल्याचं हाके म्हणालेत.   

sharad pawar is behind hindutva of maharashtra navanirman sena 

loading image