कुटुंबीयांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री घेणार शस्त्रक्रियेचा निर्णय | Uddhav thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

कुटुंबीयांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री घेणार शस्त्रक्रियेचा निर्णय

मुंबई: मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना गिरगावच्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये (Reliance hospital) दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आजच संध्याकाळी येणार आहेत. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर रिपोर्ट तपासतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.

वरिष्ठ डॉक्टरांचा एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटु़बींयांशी चर्चा करून घेतील अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: केंद्रात नितीन गडकरीच सहकार क्षेत्राचे खरे तारणहार - शरद पवार

मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात HN रिलायन्स हॉस्पिटल कोणतही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहीती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहीतीही सूत्रांनी दिली.

हेही वाचा: मागच्या जन्मात पाप केलेला माणूस साखर कारखाना काढतो किंवा... - गडकरी

मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. मान आणि पाठीच्या दुखण्यानं त्रस्त असल्यानं या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. ज्यावेळी या बैठकीत ते सामिल झाले, तेव्हाच त्यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली.

loading image
go to top