
नवी मुंबई, वाशी : ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांनी नुकतेच एका राजकीय व्यसपीठाच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना आवाहन करतान म्हंटले की, गुडांना घाबरायचे कारण नाही. इंटरनॅशनल गुंडांना गणेश नाइक कोण आहे हे माहीत आहे. या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मेळाव्यात गणेश नाईकांची इंटरनॅशनल गुडांशी ओळख असल्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे याबाबत केंद्र शासनाने दखल घ्यावी. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत नाईकांवर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचं बोलून दाखवलंय.
येत्या अधिवेशानामध्ये संसदेत हा विषय उपस्थित करुन गणेश नाईकांची एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत.
केवळ इथलेच नाही, तर जगात जिथे कुठे इंटरनॅशनल डॉन फिरत आहेत, त्यांना देखील गणेश नाईक माहित आहेत, असं वक्तव्य आमदार गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी तुर्भे येथील हळदी कुंकू समारंभ दरम्यान केलं होतं.
यावर प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे म्हणालात की, एखाद्या व्यक्तीचे इंटरनॅशनल डॉन सोबत संबंध असतील तर हे सर्वसामान्य नागरीकांसाठी, महिलांसाठी अत्यंत धोकादायक तर आहेच शिवाय त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या वक्तवयानंतर गणेश नाईकांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे चौकशीच्या मागणीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आणि येत्या एप्रिल महिन्यात संसदेत हा प्रश्न उचलून धरणार असं खासदार सुळे म्हणाल्या आहेत. दरम्यान इतर मंत्र्यांनी देखील याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील SIT चौकशीची मागणी करावी असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, निरीक्षक प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष जी एस पाटील, चंदू पाटील, माजी नगरसेविका सलूजा सुतार, दिव्या गायकवाड, वैभव गायकवाड आदी मान्यावर उपस्थित होते.
after ganesh naiks controversial statement about international don supriya sule will write letter to amit shah
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.