esakal | दिल्ली दौऱ्यानंतर राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दिल्ली दौऱ्यानंतर राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपविरोधी (BJP) राजकीय पक्षांच्या दिल्लीत (Delhi) झालेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत येताच मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. दिल्लीत (Delhi) झालेल्या राजकीय भेटींबाबत ठाकरे (Thackeray) आणि राऊत (Raut) यांच्यात चर्चाही झाली आहे.

लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी पक्षांची जमवाजमव सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या ब्रेकफास्ट बैठकीत संजय राऊत सहभागी झाले होते. त्यानंतर आज मुंबईत येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत पक्ष संघटनेबाबत चर्चा झाल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्लीत होत असलेल्या राजकीय भेटीगाठींबाबत चर्चा झाली. २०२४ मध्ये युतीच्या प्रश्‍नावर जी काही चर्चा झाली त्याची माहिती मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेन, असे राऊत यांनी तेव्हा राहुल गांधी यांना सांगितले होते.

हेही वाचा: मोदी सरकारवर राहुल गांधी बरसले;पाहा व्हिडिओ

शिवसेनेची मालकी कोणाकडे नाही

राहुल गांधी यांना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्याबाबत त्यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या. शिवसेनेने जे केले ते योग्य केले. शिवसेनेची मालकी कोणाकडे नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला.

आरक्षणावर घटनात्मक चर्चा

मराठा आरक्षणाबाबत मत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सगळ्यांना माहिती देतील. संसदेत मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक चर्चा मागणार आहोत, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.

loading image
go to top