puran poli in vande bharat sleeper
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीची चव चाखता येण्याची शक्यता आहे. या गाडीच्या खाद्यपदार्थांच्या यादीत महाराष्ट्राची पारंपरिक पुरणपोळी समाविष्ट करण्याचा विचार भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाकडून (आयआरसीटीसी) सुरू आहे. त्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.