
दहीहंडी म्हटलं की ठाण्याची पंढरी, मुंबईतला उत्साह आणि गोविंदांच्या थरारक चढाईशिवाय चित्र पूर्णच होऊ शकत नाही. दरवर्षी होणाऱ्या या उत्सवात गोविंदा पथकांचं कौशल्य, ताकद, एकजूट आणि साहस पाहून प्रेक्षक भारावून जातात. अनेक दशके उपनगरातील दहीहंडी स्पर्धांमध्ये आपलं वर्चस्व राखणाऱ्या जोगेश्वरीच्या "जय जवान गोविंदा पथका"ने यावर्षी एक असा पराक्रम केला आहे. ज्यामुळे दहीहंडीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नवं पर्व कोरलं गेलं आहे. याचबरोबर त्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा आता पूर्ण झाली आहे.