Mumbai News : आधी मेडिकल इमर्जन्सी नंतर बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा; मुंबई विमानतळावर एकच खळबळ

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एका विमान प्रवासादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbai International Airport
Mumbai International Airportsakal

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एका विमान प्रवासादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यावरून दिल्लीकडे जाणाऱ्या या विमानात एका प्रवासाच्या छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने ते विमान मुंबईत उतरवण्यात आले.मा६ विमानतलावर या प्रवाशाने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाल्याचे पाहयाला मिळाले.

मेडिकल इमर्जन्सीमुळे मुंबईला उतरवण्यात आले होते. या वेळी एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करताच मुंबई विमानतळावर एकच गोंधळ उडाला. यानंतर बीडीडीएस मार्फत बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर तपासणीत ही अफवा असल्याच निष्पन्न झाले. शुक्रवार रात्री ही घटना घडली.

Mumbai International Airport
Ajit Pawar News : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर अजित पवारांचं विरोधकांना उत्तर, म्हणाले...

मुंबईला उतरताच प्रवाशाकडून त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला. बीडीडीएस मार्फत बॅगेची तपासणी केली असता बॅगेत काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान औषधांच्या अंमलाखाली सदरचा प्रवासी काहीही बरळत असल्याचा सोबत असलेल्या नातेवाईकांकडून दावा करण्यात आला. विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.

Mumbai International Airport
ISRO Gaganyaan Mission: अंतराळात मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा! इस्रोच्या 'गगनयान मिशन'चे चाचणी उड्डाण यशस्वी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com