Uddhav Thackeray : मोदींपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सहकुटुंब बोहरा धर्मगुरुंच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thackeray Family

Uddhav Thackeray : मोदींपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सहकुटुंब बोहरा धर्मगुरुंच्या भेटीला

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मुंबईतील अनेक कामांचं उद्घाटन केलं. शिवाय बोहरा समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला देखील मोदींनी हजेरी लावली होती. त्यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. याआधी मोदींनी बोहरा समाजासोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं.

मोदी म्हणाले होते की, माझे भाग्य असे आहे की मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेला आहे. काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील धर्मगुरूंची आज भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपर्यंत या भेटीबाबत कुठलीही माहिती नव्हती. मात्र अचानक ठाकरे कुटुंबाने आज बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली.