esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Drug Case

NCB पाठोपाठ मुंबई पोलिसांनी सुरु केला कॉर्डेलिया क्रूज ड्रग्जचा तपास

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: सध्या संपूर्ण देशामध्ये कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणाची (cordelia cruises drug case) चर्चा सुरु आहे. शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रेव्ह पार्टी (Rave party) सुरु असताना, क्रूजवर छापा मारला. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (aryan khan) अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCB कडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस डीजी शिपिंग, बीपीटीकडून माहिती गोळा करत आहेत. मुंबई पोलीस प्रत्येक एजन्सीकडे त्यांच्या भूमिकेबद्दल विचारपूस करतील.

हेही वाचा: हत्ती कसे किस करत असतील? हा प्रश्न पडला असेल तर Video पहा

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, "त्यांना या क्रूझच्या कार्यक्रमाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. या पार्टीसाठी संबंधित मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती" सूत्रांनी सांगितले की, "मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रात एपेडेमिक अॅक्टचे निर्बंध लादण्यात आले आहेत, त्यानुसार 5 पेक्षा जास्त लोक नसावेत, जर त्याचे उल्लंघन केले गेले असेल तर मुंबई पोलिस आयपीसीच्या कलम 188 नुसार गुन्हा नोंदवू शकतात"

हेही वाचा: बायडेन यांच्या एका फोन कॉलसाठी पाकिस्तानची धडपड, मध्यस्थाची घेतली मदत

मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने शनिवारी (ता. २) रंगलेल्या पार्टीदरम्यान छापा टाकून प्रतिबंधक अमली पदार्थांचा साठा जप्त केला. रात्री उशिरा झालेल्या कारवाईत एनसीबीने आठ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर तीन जणांना एनसीबीने अटक केली. आर्यन खान याला मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. आर्यनसोबत अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धमेचा यांनाही कोठडी देण्यात आली. ॲड. सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला.

loading image
go to top