esakal | अफलातून! तब्बल २६ वर्षांनी सापडली ट्रेनमध्ये चोरीला गेलेली सोनसाखळी
sakal

बोलून बातमी शोधा

अफलातून! तब्बल २६ वर्षांनी सापडली ट्रेनमध्ये चोरीला गेलेली सोनसाखळी

वसईतल्या एका महिलेला तब्बल २६ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली आहे. तब्बल २६ वर्षांनी मिळालेली सोनसाखळी बघून महिलेला धक्काच बसला आहे. 

अफलातून! तब्बल २६ वर्षांनी सापडली ट्रेनमध्ये चोरीला गेलेली सोनसाखळी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मुंबईच्या लोकल ट्रेन एखादी गोष्ट हरवली तर प्रवाशांनी अपेक्षाच सोडावी की ती पुन्हा मिळेल. जर हरवलेली वस्तू सापडली तर तुमचं नशीबचं. त्यातच मुंबईच्या लोकल ट्रेनमधून चोरलेली किंवा हरवलेली वस्तू सापडणं म्हणजे मोठीचं गोष्ट. वसईतल्या एका महिलेला तब्बल २६ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली आहे. तब्बल २६ वर्षांनी मिळालेली सोनसाखळी बघून महिलेला धक्काच बसला आहे. 

पिंकी डीकुना असं या  महिलेचं नाव आहे. पिंकी या १९९४ साली म्हणजेच २६ वर्षांपूर्वी लोकल ट्रेनमधून प्रवास करत होत्या. त्याच दरम्यान त्यांची ट्रेनच्या गर्दीत सोनसाखळी चोरीला गेली. या घटनेची माहिती त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना दिली आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या संदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसंच या प्रकरणाचा पोलिसांनी तपास देखील सुरु केला होता. मात्र तब्बल २६ वर्षांनी पोलिसांनी आरोपी मोहम्मद निजाम नासिरला अटक केली आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनी पिंकी याना चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली. सोनसाखळी परत मिळाल्यानं पिंकी यांना खूप आनंद झाला आहे. 

हेही वाचाः  सप्टेंबरपासून मुंबई लोकल सुरु होणार?, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी ही सोनसाखळी पिंकी यांना त्यांच्या घरी जाऊन दिली आहे. यावेळी पिंकी यांना आनंद ही झाला त्यासोबतच त्यांना धक्काही बसला. १९९४ ला पिंकी या कामानिमित्त चर्चगेटला आल्या होत्या. त्यावेळी प्रवासात त्यांची ही सोनसाखळी चोरीला गेली होती. ही सोनसाखळी सात ग्रॅमची आहे. आताच्या घडीला या सोनसाखळीचं मूल्य खूप जास्त आहे.

अधिक वाचाः  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, कोसळण्याआधी अशी दिसत होती तारीक इमारत


तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं.
२००६ साली एका लोकल प्रवाशानं ट्रेनमधून पाकिट हरवल्याची तक्रार केली होती. ते पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं आहे ते सुद्धा जुन्या ५०० रुपयाच्या नोटेसह. हेमंत पडळकर यांचं २००६ साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल या  लोकल ट्रेनमध्ये त्यांचं पाकिट चोरीला गेलं होतं. त्यावेळी त्यांच्या पाकिटमध्ये ९०० रुपये होते.

Vasai lady got stolen gold chain after 26 years by mumbai central railway police

loading image
go to top