

Maharashtra Budget 2026
ESakal
गुरुवारी महाराष्ट्र विधिमंडळात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. शुक्रवारी (६ मार्च) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत २०२६-२७ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या कोणत्याही नवीन योजनांचा समावेश नसल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. त्याऐवजी वित्तीय शिस्त, जुन्या योजनांचा आढावा आणि चालू प्रकल्पांचे प्राधान्यक्रम हे या अर्थसंकल्पाचे मुख्य विषय असतील.